हिंजवडी, ता. ३१ : वाकड-हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला गुरुवारी (ता. २) यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त देवाची पारंपरिक बगाड मिरवणूक दुपारी ३ वाजता निघणार आहे. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाकड-हिंजवडी वाहतूक पोलिस विभागाने वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले आहेत. त्या बदलांचा अवलंब करून कोंडी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री म्हातोबा देवाची यात्रा गुरुवारी सुरू होत असून हिंजवडी गावठाणातून निघणारी बगाड मिरवणूक भूमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती मार्गे वाकड गावठाणात जाऊन म्हातोबा मंदिरात जाणार आहे. या मिरवणुकीत तब्बल लाखभर भाविक सहभागी होतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
कुठे राहील वाहतूक बंद ?
- टाटा टी चौक ते वाकड नाका
- जिओमेट्रिक सर्कल ते वाकड नाका
- शिवाजी चौक ते भूमकर चौक
- इंडियन ऑईल चौक ते विनोदे वस्ती
- मुळा नदी ब्रिज ते वाकड नाका (भुजबळ चौक)
- कस्पटे चौक ते वाकडगाव चौक
- मानकर चौक ते वाकडगाव चौक
पर्यायी मार्ग कोणते ?
- लक्ष्मी चौक-भूमकर चौक मार्ग
- शिवाजी चौक-मेझा ९-लक्ष्मी चौक मार्ग
- इंडियन ऑईल चौक-कस्तुरी चौक मार्ग
- वाकड ओव्हरब्रीज/ वाकडगाव मार्ग
- जगताप डेअरी चौक-काळेवाडी फाटा मार्ग
अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांना या मार्गांवर बंदी राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. यात्रेदरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने सर्वांनी संयम राखून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.