पिंपरी-चिंचवड

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन तरुणांना बोडकेवाडीत अटक

CD

हिंजवडी, ता. २६ : मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन तरुणांना हिंजवडी पोलिसांनी बोडकेवाडी फाट्यापाशी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख २५ हजार रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकलींसह एक लॅपटॉप व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातून १० गुन्हे उघडकीस आले.
आदित्य संतोषकुमार पटेल (वय २३, रा. बोडकेवाडी, माण, मूळ रा. छत्तीसगड), ओम किशोर चिस्तळकर (वय १९, रा. बोडकेवाडी, माण, मूळ रा. वाशीम) अशी आरोपींची नावे आहेत. भूषण प्रकाश बागुल (वय २६, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांची बजाज पल्सर चार फेब्रुवारीला मारुंजीतून चोरीला गेली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या अनुषंगाने व परिसरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सक्रिय झाले होते.
हे पथक २० एप्रिलला सायंकाळी गस्त घालत होते. त्यावेळी बोडकेवाडी फाट्यापाशी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर एक तरुण संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव आदित्य होते. साथीदार ओमसह दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी ओमलाही अटक केली. त्यांनी हिंजवडी, वाकड व चिंचवड परिसरातून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे यांच्या नियंत्रणात सहायक निरीक्षक सोमनाथ पांचाळ दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, नरेश बलसाने, चिंतामण जोशी, संदीप मासाळ, कैलास केंगले, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, कबीर पिंजारी, नितीन कोहक, मिनीनाथ पवार, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अजित शिंदे, अरुण पारधी यांच्या पथकाने केली.

---
हिंजवडी : दोन आरोपींकडून जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी व मुद्देमालासह पोलीस अधिकारी व तपास पथक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Neymar Return Video: ९८१ दिवसांची प्रतिक्षा संपली... प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट अन् मैदानात पाऊल ठेवताच नेमारच्या डोळ्यात अश्रू

अखेर समांथाने दिली गुडन्यूज! भर कार्यक्रमात म्हणाली, 'मला आता मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागेल'

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

SCROLL FOR NEXT