सकाळ इम्पॅक्ट
वाकड, ता. २५ : वाकडमधील खासगी शाळांच्या बेशिस्त कारभारामुळे निर्माण होणाऱ्या ‘गोंधळाचा तासा’ची दखल ‘सकाळ’ ने घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शाळांकडून रस्ते बंद करून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची हिंजवडी वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेत शुक्रवारी (ता.२४) संबंधित शाळांना नोटिसा बजावत जोरदार कारवाई केली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
भूमकर चौक ते लक्ष्मी चौक, हिंजवडी दरम्यानच्या कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या खासगी शाळांना वाहतूक विभागाने तातडीने नोटिसा बजावल्या. रस्ता अडवून वाहतूक नियंत्रित करण्याचा अधिकार सुरक्षा रक्षकांना नसल्याचे स्पष्ट करत तेथे नियमितपणे वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. ‘नो पार्किंग’मध्ये वाहने लावणाऱ्या पालकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच आम्ही तातडीने पाहणी केली. शाळांच्या सुरक्षा रक्षकांना रस्ता अडविण्यास सक्त मनाई केली आहे. नियम मोडल्यास थेट शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करू.
- राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग
‘सकाळ’ने चांगल्या विषयाला वाचा फोडली. दुपारी या रस्त्याने ये-जा करणे म्हणजे काळजात धस्स होत असे. आता पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे ‘सकाळ’मुळे आमचा रोजचा तासभराचा वेळ वाचला.
- अमर देसाई, रहिवासी, विनोदेनगर, वाकड
WKD26A10963
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.