पिंपरी-चिंचवड

पुनावळेतील ऑक्सिजन पार्कवरच प्रदूषणाचे ढग

CD

हिंजवडी, ता. २७ ः पुनावळेतील ऑक्सिजन पार्कजवळ सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या परिसरात मोठ्या संख्येने निवासी सोसायट्या असून रहिवाशांना धूर, दुर्गंधी आणि आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रतिबंध घालावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुनावळेतील नागरिकांना स्वच्छ हवा आणि हरित परिसर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑक्सिजन पार्क विकसित केले जात आहे. २२.८० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानात वृक्षारोपण, वॉकिंग ट्रॅक, किड्स प्ले एरिया, खुली जागा आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. ओपन जिमची अनेक उपकरणे व साधने लावली आहेत. मात्र, पार्कला लागूनच अनेक वीटभट्या आहेत.

वन विभागाकडून देखरेख
ऑक्सिजन पार्क परिसरात गिरीपुष्प (उंदीर मारी) ही विदेशी व हानिकारक वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही वनस्पती काढून त्या ठिकाणी वन विभागाच्या पुढाकाराने देशी पर्यावरणपूरक वनस्पती लावण्यात येत आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर उपकरणे व साहित्य येऊन पडले आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेच्या कारणावरून सायंकाळी सहानंतर पार्कमध्ये जाण्यास बंदी आहे. मात्र, इतरवेळी नागरिकांना प्रवेशास मुभा आहे, असे वनपरीक्षेत्र अधिकारी रावसाहेब राठोड यांनी सांगितले.

अशी आहे वस्तुस्थिती?
- अनेक वीटभट्ट्यांकडून दिवसभर विषारी धूर
- दगडी कोळसा, लाकडे यांसारख्या पारंपरिक इंधनासोबतच काही ठिकाणी टाकाऊ साहित्याचा वापर
- जुने टायर, प्लॅस्टिक वा रबर जाळल्यामुळे तीव्र दुर्गंधी, धुरामध्ये हानिकारक रसायनांच्या प्रमाणात वाढ
- उग्र वास आणि धुराचे मोठे उत्सर्जन, प्रदूषणाचा परिसराला घट्ट विळखा
- हवेची गुणवत्ता खालावून श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, घशात खवखवीच्या तक्रारी

वीटभट्ट्यांच्या धुरामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे वीटभट्ट्यांची तत्काळ तपासणी करावी. टायर व घातक पदार्थ जाळण्यावर बंदी घालून ऑक्सिजन पार्क नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करावे.
- नंदन मिठारी, रहिवासी, जीके रोज अस्टर सोसायटी

प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. त्याअंतर्गत शहरातील वीजभट्ट्या शहराबाहेर हलवाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. कारण, वीटभट्ट्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी दिले जाते.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT