वाकड, ता. २१ : ताथवडे गाडा रस्त्यावरील रहिवासी सोसायट्यांच्या परिसरात असलेला कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी ३० मेला कचरा डेपोजवळ मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांनी घेतला.
या रहिवाशांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध प्रतिनिधींमध्ये सविस्तर चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. सकाळी ९ वाजता मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले असून प्रभागातील सर्व नगरसेवक तसेच सर्वपक्षीय नेत्यांना आंदोलनासाठी निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले.
परिसरातील सर्व सोसायट्यांकडून कचरा डेपो विरोधातील निवेदने पुन्हा संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळावा यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. ‘आता एकच ध्येय... कचरा डेपो हटाव,’ असा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.