पिंपरी-चिंचवड

कावेरीनगर भुयारी मार्गात रात्रीत कचऱ्याचे ढीग

CD

वाकड, ता. १२ : कावेरीनगर भुयारी मार्गामध्ये दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसर अक्षरशः कचरा कुंडीचे स्वरूप धारण करत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सकाळ होताच आरोग्य कर्मचाऱ्यांना परिसराची स्वच्छता करावी लागत आहे.
काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, समाजातील काही बेजबाबदार घटक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरगुती तसेच व्यावसायिक कचरा भुयारी मार्गात टाकतात. सकाळी नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या कचऱ्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या कचऱ्यामुळे नाला तुंबण्याचा आणि पाणी साचण्याचाही धोका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती उपक्रम राबवूनही काही नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे.

बिनबोभाट कचरा
थेरगाव, १६ नंबर, संतोषनगर,वाकड, गुजरनगर हा भाग व आजूबाजूच्या महत्त्वाच्या कॉलनींमध्ये बॅचलर विद्यार्थी, नोकरदार तरुण मोठ्या प्रमाणात राहतात. या सर्वांचे रात्री अपरात्री रूमवर येणे जाणे सुरू असते. त्यामुळे, घंटागाडी त्यांना सापडतच नाही. परिणामी, काहीजण बिनबोभाट कचऱ्याच्या पिशव्या टाकतात.

रोजचा हा ओंगळवाणा प्रकार झाला आहे. त्यामुळे मी स्वखर्चातून भुयारी मार्गात लांबलचक आरसा बसवणार आहे. जेणेकरून कचरा टाकणाऱ्यांना स्वतःची लाज वाटावी. कावेरीनगर भुयारी मार्गाची स्वच्छता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी.
- डॉ. नंदकुमार धुमाळ, रहिवासी, वाकड


‘ड’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत आम्ही या बाबीला पायबंद घालण्यासाठी एका कर्मचाऱ्यांची अर्धवेळासाठी नियुक्ती केली होती. मात्र, तो निघून जाताच पहाटेच्या वेळेस हॉटेल व्यावसायिकांसह दुकानदार व काही नागरिक कचरा टाकून जातात. भुयारी मार्गाचा काही भाग ‘ग’, काही भाग ‘ज’ च्या अखत्यारीत येतो. दोन्ही प्रभागांच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
- उमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक, ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय

WKD26A11570

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Mumbai Emergency Helpline Numbers: मुंबईत दरड कोसळल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत कोणता नंबर डायल कराल? जाणून घ्या सर्व हेल्पलाईन क्रमांक

Marathi News Live Updates : चंदा चोर, चंदा चोर! लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी, अमित शहांना चर्चेला बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT