वाकड, ता. १६ : वाकड पोलिस लाइन परिसरातील वेणूनगर येथील हनुमान मंदिरात २५ ऑगस्ट दरम्यान शिव चरित श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचक निर्मल गुप्ता हे कथा सादर करणार आहेत.
दररोज सायंकाळी ५.१५ ते ७.१५ या वेळेत कथा होणार असून, भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक केशव जांगड यांच्याद्वारे करण्यात आले आहे. भगवान श्रीराम यांच्या जीवनचरित्रासह विविध आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रसंगांचे विवेचन केले जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.