पिंपरी-चिंचवड

हिंजवडीतील आयटी कंपन्या बाहेरच्या वाटेवर

CD

हिंजवडी, ता. १८ : ‘‘हिंजवडीमध्ये मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. तसेच २० मोठे उद्योग महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत,’’ असा दावा शिवसेनेचे (यूबीटी) माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी हिंजवडीतील गैरसोयी आणि वाहतूक कोंडीवरही भाष्य केले.

आयटी परिसरातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे यांनी हिंजवडीचा दौरा केला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांबरोबरच वाहतूक कोंडीचा थेट परिणाम उद्योगांच्या आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असूनही त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. केवळ पोलिसांची संख्या वाढवून उपयोग नाही, तर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन आवश्यक आहे. हिंजवडी आयटी पार्कवर सुमारे साडेसहा लाख जण थेट अवलंबून आहेत. या परिसरातून सुमारे १५ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. येथील पायाभूत सुविधांचा प्रश्न स्थानिकांचा नसून राज्याच्या रोजगार आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे येथील सुविधा सक्षम करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून रोजगार टिकविण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत,’’ अशी मागणी ठाकरे यांनी या वेळी केली.

मेट्रोच्या रखडलेल्या कामावरही निशाणा
‘‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्यास विलंब होत आहे. केवळ चाचणी सुरू असल्याच्या नावाखाली वेळ मारून नेली जात आहे. उद्घाटनाची तारीख अजूनही निश्चित होत नाही. सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध झाल्यास हिंजवडीतील वाहनांचा ताण कमी होऊ शकतो,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारला आवाहन
- हिंजवडीतील समस्या सोडविल्यास कर्मचाऱ्यांची जीवनशैली सुधारेल
- उद्योगांसाठी महाराष्ट्राचे आकर्षण कायम ठेवता येईल
- सरकारने येथील प्रश्नांकडे रोजगार आणि उद्योगांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून पाहावे

प्रभावी नेतृत्वाविना पुण्याची वाताहत
मुख्यमंत्र्यांनी मनात आणले, तर काहीही होऊ शकते. सर्व यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समोर बसवून वेळोवेळी आढावा घेतला, तर येथील प्रश्न चुटकीसरशी सुटतील. मात्र, प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नाही. फोडाफोडीच्या राजकारणामुळे गेल्या अनेक वर्षांत पुण्याला प्रभावी नेतृत्व मिळालेच नाही. त्यामुळे पुण्याची वाताहत झाल्याची टीका त्यांनी केली. ‘‘चिन्ह कोणाला मिळेल’’, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘‘न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,’’ असे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT