पिंपरी-चिंचवड

‘सीएसआर’मधून वीस कोटींच्या जिल्हा परिषद शाळा उभारणार

CD

हिंजवडी, ता. ५ : ‘‘जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी ‘कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी’च्या (सीएसआर) माध्यमातून सुमारे २० कोटी रुपये खर्चून शाळा उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, तसेच ‘नासा’, ‘इस्रो’ आणि युरोपियन स्पेस एजन्सीसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. दुसरीकडे माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ‘मॉडेल पीएचसी’ (आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र) म्हणून विकास, तर पिरंगुटला ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गुरुवारी (ता. ५) दिली.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘ग्राम समृद्धी हिंजवडी’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात झाला. यावेळी पाटील बोलत होते. या सोहळ्यास आमदार शंकर मांडेकर, मुळशी पंचायत समिती सभापती मंदा शेळके, जिल्हा परिषदेचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील, नगरसेवक राहुल कलाटे, माजी संचालक बाळासाहेब विनोदे, ‘राष्ट्रवादी युवक’चे तालुकाध्यक्ष सागर साखरे, नगरसेविका स्नेहा कलाटे, नंदकुमार भोईर, म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब हुलावळे, किसन साखरे पाटील, विजय जांभूळकर, मच्छिंद्र जांभूळकर, पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या वाघमारे, प्रवीण धनवे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, वसंत साखरे, संतोष साखरे, माजी सरपंच सचिन जांभूळकर, विक्रम साखरे, मच्छिंद्र हुलावळे, राहुल जांभूळकर, मनीषा हुलावळे, प्रशासक अजित साकोरे, राहुल सोनवणे, बाबाजी शेळके, यशवंत साखरे, संदीप साखरे, बाळासाहेब कलाटे, मारुती कलाटे, वसंत कलाटे, पांडुरंग सुतार, संतोष पारखी, नंदकुमार साखरे, दत्तात्रेय जांभूळकर, उत्तम काकडे, आनंदा जांभूळकर, विशाल साखरे, ॲड. सम्राट जांभूळकर, अजिंक्य बालवडकर, श्रीधर जांभूळकर, दीपक मलगार, ए. टी. पाटील, नंदकुमार धुमाळ, केदार आयाचित यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असताना हिंजवडी परिसरात मात्र विविध शैक्षणिक प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रशासकीय बदल झाले तरी परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’
आमदार शंकर मांडेकर म्हणाले, ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मेट्रो प्रकल्पामुळे या भागातील जनजीवनाला गती मिळणार आहे. सर्वांनी एकजुटीने मिळून योगदान दिल्यास निश्चितपणे या भागाचा चेहरामोहरा बदलेल.’’
तर, राहुल कलाटे यांनी हिंजवडीसह आयटीच्या जडणघडणीचा आढावा घेत ‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतुक केले.
‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी प्रास्ताविकात ‘ग्रामसमृद्धी’ या संकल्पनेचा विचार मांडला. मुख्य उपसंपादक नीलेश शेंडे यांनी ‘ग्रामसमृद्धी’ संकल्पनेमागील भूमिका विषद केली. या सोहळ्यासाठी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत अधिकारी अमोल घोळवे यांनी आभार मानले.

पुस्तकाबाबत मान्यवरांच्या प्रतिक्रिया...
सागर साखरे : हिंजवडी गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा आहे. तो नव्या पिढीसमोर मांडण्याचे काम ‘ग्रामसमृद्धी’ पुस्तकाने केले आहे. हा ठेवा पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल.

शिवाजी बुचडे पाटील : गावाच्या विकासामध्ये अनेक पिढ्यांचे कष्ट, त्याग आणि योगदान असते. ‘सकाळ’ने या पुस्तकातून अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या योगदानाला व्यासपीठ दिले आहे.

मंदा शेळके : हिंजवडीच्या विकासात गावची संस्कृती, परंपरा आणि माणुसकी जपणेही महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने या पुस्तकातून विकास आणि परंपरा यांचा सुंदर समन्वय साधला आहे.

ऐश्वर्या वाघमारे : सध्याच्या पिढीला गावाचा इतिहास किती समृद्ध आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. जुन्या पिढीचे अनुभव, संघर्ष आणि विकासाचा प्रवास पुस्तकातून समोर आला आहे.

बाळासाहेब हुलावळे : हिंजवडीने जागतिक आयटी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बदलामागील लोकांचे योगदान, प्रशासकीय प्रयत्न, ग्रामस्थांची एकजूट पुस्तकातून अधोरेखित झाली आहे.

किसन साखरे पाटील : हिंजवडीतील जुन्या वाड्या, मंदिरे, यात्रा, ग्रामसंस्कृती यांची आठवण पुस्तकामुळे पुन्हा ताजी झाली. आधुनिक हिंजवडीला तिच्या मूळ गावाशी जोडण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे.

विजय जांभूळकर : हिंजवडीमध्ये देश-विदेशातील हजारो लोक कामासाठी येतात. ‘ग्रामसमृद्धी’ पुस्तकामुळे आयटी क्षेत्र आणि स्थानिक ग्रामसंस्कृती यांच्यात संवादाचा नवा दुवा निर्माण होईल.

राहूल जांभूळकर : ‘ग्रामसमृद्धी हिंजवडी’ हे केवळ माहितीपर पुस्तक नाही, तर गावाची ओळख जपणारा महत्त्वाचा दस्तावेज आहे.

मच्छिंद्र हुलावळे : ‘सकाळ’ने ‘ग्रामसमृद्धी’ उपक्रमातून सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळते.

सचिन जांभूळकर : भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळाचा वेध घेणारे ‘ग्रामसमृद्धी’ पुस्तक दिशादर्शक आहे. ‘सकाळ’ने हा उपक्रम राबवून हिंजवडीच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे.

अभिषेक नंदन : ‘ग्रामसमृद्धी’ पुस्तक व व्हिडिओ चित्रफितीचा प्रकाशन सोहळा अतिशय सुंदर झाला. हिंजवडीच्या वाटचालीवर आधारित हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Latest Marathi News Live Update : घातक हत्यारे जवळ बाळगून फिरणाऱ्या दोघांना अटक

SCROLL FOR NEXT