पिंपरी-चिंचवड

Video : इंडियन फ्लॅपशेल प्रजातीचं कासव; दुखापतग्रस्त अवस्थेत होतं, तितक्यात...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सुमारे 15 किलो वजनाचे इंडियन फ्लॅपशेल प्रजातीच्या कासवाला वर्ल्ड फॉर नेचरच्या स्वयंसेवकांनी नुकतेच जीवदान दिले. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या सल्ल्याने दुखापतग्रस्त कासवावर उपचार करून त्याला दुर्गादेवी टेकडी येथील तळ्यात सुखरुप सोडण्यात आले. 

निगडी येथील आशीर्वाद कॉलनीमधील रुपेश शर्मा यांनी आमच्या घराजवळ खूप मोठे कासव आढळले आहे, असे वर्ल्ड फॉर नेचरचे योगेश कांजवणे यांना संपर्क साधून कळविले. त्यानंतर, 20 मिनिटांत वर्ल्ड फॉर नेचरचे राजेश कांबळे आणि विष्णू तरंगे हे त्या ठिकाणी पोचले. तेथे सुमारे 15 किलो वजनाचे इंडियन फ्लॅपशेल प्रजातीचे कासव होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या छातीवर जुन्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या अभिरक्षक डॉ. चैत्राली आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यावर उपचार केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. आव्हाड म्हणाल्या, "कासवाच्या छातीच्या खालील बाजूला 2 जुन्या जखमा झाल्या होत्या. त्याला जंतुसंसर्गही झाला होता. माझ्या सल्लाने तीन दिवस वर्ल्ड फॉर नेचरच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. हे गोड्या पाण्यातील कासव आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वर्ल्ड फॉर नेचरचे अध्यक्ष शुभम पांडे म्हणाले, "कासवामध्ये सुधार झाल्यावर त्याला वन्यजीव संरक्षक रामानंद गावडे, राजेश कांबळे, अनिकेत पायगुडे यांच्या उपस्थितीत निगडीच्या दुर्गादेवी टेकडी परिसरातील तळ्यात सोडण्यात आले. या प्रजातीचे कासव नदी अथवा तळ्यात आढळते. मासे, गोगलगाय, बेडूक, पाणवनस्पती हा त्याचा आहार असतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT