सोमाटणे, ता. २१ ः मुंबईहून गावाकडे व पर्यटनस्थळी आलेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. २१) परतीचा प्रवास सुरू केल्याने आज चौथ्या दिवशीही महामार्गावर वाहतूक कोंडी सुरुच होती.
शनिवार, रविवार सुट्टीला जोडून सोमवारची निवडणुकीची सुट्टी होती. यामुळे अनेक मुंबईकरांनी आपल्या गावी किंवा पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखला. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी शनिवारीच गावाची व पर्यटन स्थळाची वाट धरली होती. परिणामी, शनिवारी दिवसभर द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.
गावी व पर्यटनस्थळी गेलेल्या सर्व नागरिकांनी तीन दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर आज परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे सकाळपासूनच पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने दोन्ही महामार्गावर मुंबई बाजूच्या लेनवर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. यामुळे दिवसभर वाहने धिम्या गतीने जात होती. दोन्ही टोल नाक्याजवळची जागा अरुंद असल्याने लेन वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी ही कायमचीच झाली आहे. रस्ते विकास महामंडळाने टोलनक्याच्या दोन्ही बाजूच्या लेनच्या जागा वाढविल्यामुळे रस्ता रुंदीकरण करूनही वाहतूक कोंडी कायमच आहे.
PNE24U21156
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.