पिंपरी-चिंचवड

...म्हणून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेकडे जाताना 'या' ठिकाणी होते वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ (ता. मावळ) : पुणे-मुंबई महामार्गावरून द्रुतगती मार्गावर जाताना दररोज वाहतूक कोंडी होते. सोमाटणे चौकात उभ्या असणाऱ्या हातगाड्या आणि पवन मावळात जाणारी वाहतूक यामुळे या कोंडीत भर पडते. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी नवनिर्वाचित उपसरपंच सुधीर मुऱ्हे यांनी केली आहे. 

सोमाटणे चौकातील रस्त्यावर अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. दररोज सायंकाळच्या वेळेत तसेच रविवारी सुटीच्या दिवशी या चौकात हातगाड्या उभ्या असतात. त्याचा स्थानिक वाहनचालकांना व येथील शिरगाव, दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे व परंदवडी येथील ग्रामस्थांना जाताना त्रास सहन करावा लागतो. हातगाडीवाले, भाजी विक्रेत्यांना जवळ ग्रामपंचायतीने भाजी मार्केट उभे करून दिल्याने येथील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. चौकात वाहतूक पोलिसांची येथे दमछाक होते. त्यामुळेच या ठिकाणी वाहतुकीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहतुकीच्या प्रमुख अडचणी 
- पवन मावळातील सर्वच गावांतील वाहतूक वाढल्याने कोंडी
- अनेकदा वाहनचालक विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात 
- अपघाताच्या घटना घडल्यानंतर बराच वेळ वाहतूक कोंडी 
- या चौकाजवळच मोठ-मोठे रुग्णालय असल्याने वाहतुकीत भर 
- द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी याच चौकाचा पर्याय 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाच वर्षांपासून सोमाटणे चौकात सिग्नल यंत्रणा बसवावी. यासाठी मागणी होत आहे. तरी अद्याप या ठिकाणी सिग्नल यंत्रणा न बसविल्याने याबाबत आपण पाठपुरावा करणार आहे. 
- सुधीर मुऱ्हे, उपसरपंच सोमाटणे 

पवन मावळातील वाहतूक या चौकातून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे. अद्याप ती पूर्ण झालेली नाही. 
- विष्णू मुऱ्हे, स्थानिक नागरिक, सोमाटणे फाटा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT