पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कंटेन्मेट झोन वगळता शहरातील अन्य भागातील व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
आपल्याला त्याचा संसर्ग होऊ नये, म्हणून प्रत्येक नागरिक आता जागरुक झाला असून, दुचाकीवरून कामासाठी बाहेर पडणाऱ्या मंडळींकडून मास्कच्या वापराला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र शहराच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळाले.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाहनांची वर्दळ वाढली...
गेल्या आठवड्यापासून शहरात नागरिकांची वर्दळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने वाहनांच्या वापराला परवानगी दिल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी शहरातल्या रस्त्यावर वाढताना दिसत आहे. दरम्यान, सिग्नलला थांबताना अनेक जण दोन वाहनांमध्ये अंतर ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काही दिवसांमध्ये मॉन्सूनला सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे नजिकच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे दुचाकी चालकांकडून योग्य ती खबरदारी घेत मास्कचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.