Traffic-Police 
पिंपरी-चिंचवड

VIDEO - ट्राफीक पोलिसाला बोनेटवरून नेलं आणि म्हणे, माझी चूक काय?

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - विनामास्क चाललेल्या मोटारचालकाला कारवाईसाठी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिस बोनेटवर असतानाही चालकाने मोटार न थांबविता तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत मोटार दामटली. दरम्यान, वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत मोटारीच्या बोनेटला पकडले. अखेर धावत्या मोटारीसमोर नागरिकांनी गाड्या आडव्या घातल्यानंतर त्याने मोटार थांबविली. हा प्रकार चिंचवड येथे घडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आबासाहेब सावंत असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर युवराज किसन अनवते (वय 50, रा. विशालनगर, पिंपळे निलख) आरोपी असे मोटारचालकाचे नाव आहे. सावंत हे चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असून गुरूवारी (ता. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास ते अहिंसा चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी अनवते विनामास्क असल्याने सावंत यांनी थांबण्याचा इशारा केला असता तो पुढे जाऊन थांबला. दरम्यान, मास्क लावला नसल्याने पावती करा, असे सांगण्यासाठी सावंत त्याच्याजवळ गेले असता तो मोटार पुढे-पुढे घेत होता. सावंत मोटारीसमोर गेले असता त्याने मोटारीचा वेग वाढविला. सावंत यांच्या पायाला धडक दिल्याने ते मोटारीच्या बोनेटवर पडले.

त्यानंतरही त्याने मोटार न थांबविता वेगात मोटार दामटली. वारंवार विनंती करूनही मोटार थांबविली नाही. यावेळी प्रसंगावधान राखत सावंत यांनी मोटारीच्या बोनेटला पकडले होते. दरम्यान, बाजूने जाणाऱ्या इतर दुचाकीचालकांनी गाड्या आडव्या लावण्यासह समोरील मोटारचालकालाही मोटार थांबविण्यास सांगितल्याने अनवते याने अखेर त्याची मोटार थांबविली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अनवते याला ताब्यात घेतले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT