पिंपरी : महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले वृक्षगणनेचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वृक्षांचा डेटा कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होणार आहे.
महापालिकेच्या वतीने यंदा प्रथमच अॅपच्याद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे. त्यासाठी एका ठेकेदाराला दोन वर्षांसाठी काम देण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महापालिका पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. यापैकी सॉफ्टवेअर, यंत्रसामग्री खरेदीसाठी ठेकेदाराला एक कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र, मुळातच प्रत्यक्षात ठेका देताना दिरंगाई झाली. त्यामुळे काम उशिरा सुरू झाले होते. त्यातच गतवर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे वृक्षगणनेचे काम अपेक्षित वेगाने होऊ शकले नाही. ठेकेदाराची मुदत यंदा मार्चमध्ये संपली. लॉकडाऊनमुळे कामगार नसल्याने तसेच अ प्रभागात काही नागरिकांनी वृक्षगणनेस आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दिल्याने काम थांबविण्यात आले होते. त्याचीही परिणती काम रखडण्यात झाली.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय आहे सद्यःस्थिती
महापालिकेचे सध्या आठ प्रभाग असले, तरी वृक्षगणनेचे काम सुरू झाले होते, तेव्हा सहा प्रभाग होते. या सहापैकी अ आणि ब प्रभागातील वृक्षगणनेचे काम पूर्ण झाले असून क प्रभागात काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदारास मुदतवाढ देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, सहा महिने ते एक वर्षापर्यंत कामास मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वृक्षगणनेमुळे झाडाचा प्रकार, त्याचे नेमके ठिकाण, आकार, उंची इत्यादींची सविस्तर माहिती कायमस्वरूपी संकलित होणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात कोणत्या प्रकारची, किती झाडे आहेत हे नेमके कळू शकेल. त्यामुळे भविष्यात वृक्षारोपण करताना या माहितीचा उपयोग करता येईल.
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.