Arrested Sakal
पिंपरी-चिंचवड

दीड लाख रुपये लाच स्विकारल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा, दोन अटकेत

तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपये लाच स्विकारल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार कुतुबुद्दीन गुलाब खान (वय-५२), खासगी इसम यासीन कासम शेख (वय-५८) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आली आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे (वय-५०) यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थामार्फत २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने (वय-३९) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शुक्रवारी (ता.१३) लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात सापळा लावण्यात आला होता. तडजोडअंती ठरलेली दीड लाख रुपयांची लाच खासगी इसम यासीन शेख यांच्यामार्फत स्विकारताना सहाय्यक फौजदार कुतुबुद्दीन खान यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कारवाईची माहिती मिळताच निरीक्षक मोरे फरार झाले. शनिवारीही (ता.१४) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू होती. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, कर्मचारी मुश्ताक खान, अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे, दामोदर जाधव, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT