Two Arrested for PMP bus driver beaten and bus vandalized in pimpri 
पिंपरी-चिंचवड

धक्कादायक; पीएमपी बस चालकाला मारहाण करत बसची तोडफोड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पीएमपी बस अडवून बसचालकाला बेदम मारहाण करीत बसच्या काचा फोडल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

स्वप्नील बाळासाहेब तिखे (वय 22, रा. पाषाण गाव, पुणे), शुभम अरविंद जाधव (वय 21, रा. जाधव वाडा, पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत दत्तात्रय भोकरे (वय 31, रा. फुरसुंगी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोकरे हे पीएमपी बस चालक आहेत. ते शनिवारी (ता.30) स्वारगेट-सांगवी या मार्गावरील बसवर कर्तव्यावर होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सांगवी येथून पुन्हा स्वारगेट येथे बस घेऊन जात असताना जुनी सांगवी येथे वेताळ महाराज मंदिराजवळ दुचाकीवरून आरोपी आले. आरोपींनी भोकरे यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT