पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील दोन नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात; रुग्णांना क्वारंटाइन करण्यास केला होता विरोध

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी  : महापालिका प्रशासनाने आयसोलेशनसाठी ताब्यात घेतलेल्या इमारतीत कोरोनाबाधित परिसरातील नागरिकांना क्वारंटाइन करण्यास 
विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शरद ऊर्फ राजू मिसाळ आणि शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांना पोलिसांनी मंगळवारी (ता.  26) ताब्यात घेतले. नोटीस बजावून त्यांना सोडण्यात आले.

चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 22) चौदा नागरिकांना तिथे क्वारंटाइन केले आहे. पाचशे नागरिकांना तिथे क्वारंटाइन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्या परिसरातच क्वारंटाइन करावे. आमच्या ग्रीन झोनमध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाइन करू नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक नगरसेवक  राजू मिसाळ व अमित गावडे  यांनी त्याला विरोध केला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील तीन-चार दिवसांपासून या विरोधात आंदोलन सुरू 
होते. कोरोनामुळे सध्या साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी  नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांच्यासह राजेंद्र बाबर, अनुप मोरे, योगेश जाधव, निलेश जांभळे यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 149, 68, 69 अन्वये सर्वांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT