पिंपरी-चिंचवड

थेरगावातील पवना नदीपात्रात मामा-भाचे बुडाले; एकाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : थेरगावातील पवना नदीपात्राजवळून येत असताना, मामा-भाचे नदीत बुडाले. यातील एकाचा मृतदेह बाहेर काढला असून, आणखी एकाचा पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे जवान शोध घेत आहेत. पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव असून, ओम किसन जाधव (वय २५, सर्व रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉलनी, काळेवाडी) या तरुणाचा अग्निशामक  विभाग शोध घेत आहे.  

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गायकवाड, जाधव व त्यांचे दोन नातेवाईक नदीपात्राजवळून थेरगावकडे येत होते. त्यावेळी पाठीमागून कोणीतरी आवाज दिल्याने  त्यांनी नदीत उडी मारली. त्यानंतर दोघेजण नदी पात्रातून बाहेर आले. मात्र, गायकवाड व जाधव हे मामा-भाचे पाण्यात बुडाले. याबाबतची माहिती सायंकाळी सहा वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी (ता. १५) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास गायकवाड यांचा मृतदेह सापडला, तर जाधव यांचा अद्यापही शोध सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT