Pawana Dam sakal
पिंपरी-चिंचवड

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

सकाळ वृत्तसेवा

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

लोणावळा - पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ०२) घडला. सुदैवाने या घटनेत पाच जणांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले.

आर्या दिपक जैन (वय-१३) व समीर कुलदीप सक्सेना (वय-४३, दोघे रा. मुंबई) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पवना धरण परिसरात फांगणे येथे घडली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत समीर कुलदीप सक्सेना हे पत्नी पायल (वय-४२),  मुले लक्ष (वय-१४), यश (वय-८) व त्यांचे मित्र आर्या जैन (वय-१३), आदी चुगानी (वय-१४), अंश सुरी (वय-१४, नोकर  रामकुमार पासवान याच्यासह शुक्रवारी पवना धरण परिसरात पर्यटनासाठी  आले होते. पवना धरण पाणलोट क्षेत्रातील‌ फांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात पोहत होते. यावेळी समीर आणि आर्या यांच्यासह इतर पाच जणांना येथील पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. समीर सक्सेना यांचा कामगार रामकुमार पासवान यांनी आरडाओरड केला.

यावेळी स्थानिक नागरिक अनिल हिलम, संजय आंद्रे, रामदास चव्हाण, रोहिदास काळे, रामदास काळे, स्वप्नील मोकाशी यांनी तत्काळ धाव घेत पाण्यात बुडत असलेल्या बाहेर काढले. घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी रफिक शेख व विजय गाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार रफिक शेख यांनी घटनास्थळी जाताच पाण्यात उतरून स्थानिकांच्या मदतीने आर्या जैन व समीर सक्सेना यांना बाहेर काढले, मात्र समीर आणि आर्या यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT