पिंपरी-चिंचवड

पिंपरी : फार्मसी शिक्षकांसाठी ई-परिषद; अडीच हजार जणांचा सहभाग

आशा साळवी

पिंपरी : कोविड कालावधीत औषध पुनरुत्पादित करणे, औषध संशोधन प्रक्रियेला गती देण्यासाठी संगणकीय साधनांचा वापर कसा करता येईल, यासाठी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस ऍण्ड रिसर्च महाविद्यालय व असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (ए.पी.टी.आय.) संयुक्तपणे आयोजित ई - शैक्षणिक परिषद नुकतीच पार पडली. या ई-परिषदेत अडीच हजार प्राध्यपकांनी सहभाग घेतला.

'बिल्डिंग रिसर्च ऍण्ड इनोव्हेशन कल्चर अमंग फार्मसी टीचर्स' या विषयावर घेण्यात आलेल्या परिषदेत देशभरातून 2500 पेक्षा जास्त फार्मसी शिक्षकांनी सहभाग घेतला. पाच दिवसांत 'डीपीयू फार्मसी' या यु-ट्यूब चॅनेलवर 32 हजारापेक्षा जास्त दर्शक लाभले. परिषदेतील उत्कृष्ट वैज्ञानिक सत्र, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर व समन्वय या गोष्टींच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर नवे उच्चांक प्रस्थापित करून फार्मसी क्षेत्रासमोर आदर्श निर्माण केला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी ए.पी.टी.आयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, डॉ. अमित शर्द, तहसीन खंडे, डॉ. मंदार बोडस, डॉ. प्रशांत मुरूमकर, डॉ. रूपेश चिखले, अशिम सचदेव, सार्थक दंगायच, डॉ. कीर्ती लढ्ढा, प्रा.डॉ. विवेक बोरसे यांनी कोविड कालावधीत औषध पुनरुत्पादित करणे, औषध संशोधन प्रक्रियेला गती देण्यासाठी संगणकीय साधनांचा वापर, हर्बल व आयुर्वेदातील संशोधन व संधी आणि नॅनो डायग्नोस्टिकच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर या मुख्य घटकांच्या विषयांवर सादरीकरण केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. सोहन चितलांगे यांनी देशभरातून फार्मसी शिक्षकांनी तांत्रिक - शिक्षण पद्धती त्वरित आत्मसात करून बदलत्या काळानुसार वापर केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. समन्वयक डॉ. संतोष भुजबळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT