pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज ६९ केंद्रांवर लसीकरण

कोव्हिशिल्डचे २४,३०० डोस आणि कोव्हॅक्सिनचे २,२५० डोस उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेतर्फे मंगळवारी (ता. ७) ६९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत कोव्हिशिल्ड लशीचे २४ हजार ३०० व कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार २५० असे २६ हजार ५५० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तनदा माता व गर्भवतींसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

पहिला डोस घेणाऱ्यांसाठी सर्व केंद्रांवर प्रत्येक लशीचे प्रत्येकी ५० डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी २०० डोस उपलब्ध आहेत. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून, २० टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींना आठ केंद्रांवर लस

गर्भवती व स्तनदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT