Vallabhnagar ST Bus Stand Sakal
पिंपरी-चिंचवड

Vallabhnagar ST Bus Stand : वल्लभनगर आगारात सुरक्षा वाढवण्यासाठी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

CCTV Installation : पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगारात आता २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली परिसर राहणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडाळाच्या वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) आगारात नवीन १९ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता हा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. स्थानकातील चोरीच्या घटना आणि गैरकृत्य रोखण्यास मदत होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात वल्लभनगर एस.टी. आगार एकमेक स्थानक आहे. या आगारातून दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून बसेस धावतात. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. आगारात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडतात. आगारात मद्यपींचा वावर वाढलेल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर असल्याचे दिसून येते. दुसरीकडे आगारात केवळ सहाच कॅमेरे आहेत. इतक्या मोठ्या आगाराची सुरक्षा केवळ सहा कॅमेऱ्ंयावरच अवलंबून आहे. आगारातील बराचसा भाग अजूनही कॅमेऱ्याच्या नजरेत नाही.

संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनच्या बाजूने एसटीच्या जागेत पार्किंग व्यवस्था केली आहे. येथे सीसीटीव्ही नाहीत. याबाबत ‘सकाळ’ने २० मे रोजी ‘वल्लभनगर आगाराचा सुरक्षेचा प्रश्‍न जैसे-थे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. आगारातील सुरक्षेचा आणि सीसीटीव्हींची संख्या याबाबत ‘सकाळ’ने प्रश्‍न लावून धरला होता. अखेर एसटी प्रशासनाला जाग आली असून सोमवारी (ता. ४) एसटी सुरक्षा (सीसीटीव्ही) समितीने आगाराची पाहणी करून तेथील सीसीटीव्ही लावण्याची ठिकाणे निश्‍चित केली. आगारात नवीन १९ कॅमेरे बसविण्याचे निश्‍चित झाले असून आता आगारातील एकूण कॅमेरांची संख्या २५ होणार आहे.-

वल्लभनगर आगाराची पाहणी करण्यासाठी महामंडळाची समिती आली होती. या समितीने आगारात नवीन सीसीटीव्ही लावण्यासाठी जागा निश्‍चित केल्या आहेत. आगारात नवीन १९ सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, बस स्थानकाचा सर्व परिसर यात येणार आहे. पण, मागील बाजूस महामेट्रोने जागा घेतली आहे. तेथे त्यांनी सीसीटीव्ही लावावेत.

- बालाजी सूर्यवंशी आगार व्यवस्थापक, वल्लभनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emotional Raksha Bandhan: जी बहीण आता या जगात नाही, तिच्या हातांनी भावाला राखी बांधली!

Indian Railway: भारतीय रेल्वेकडून जपानमध्ये १० दिवसांची सफर, कधीपासून होणार सुरू? पहा बुकिंग प्रकिया आणि किंमत

Student End Life Kolhapur : नववीच्या मुलीला असलं काय टेन्शन आलं, राहत्या घरात घेतला गळफास अन्...

ZIM vs NZ 2nd Test: न्यूझीलंडच्या ९५ वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच असे घडले! १९८६ मध्ये भारतीयांनी केला होता असा पराक्रम...

Shiv Sena : महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा असेल, उदय सामंताचे कोल्हापुरात कोणाला आव्हान

SCROLL FOR NEXT