पिंपरी-चिंचवड

तळेगावात १२ जूनपासून विविध धार्मिक कार्यक्रम

CD

तळेगाव दाभाडे, ता. ९ ः श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि श्री गुरू वि.न. तथा दादा महाराज साखरे यांच्या ८४ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे १२ ते १९ जूनपर्यंत कीर्तन, प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच पंचमवेद श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजनही करण्यात आले आहे. या पाळण्याचे नेतृत्व नथुराम महाराज जगताप-पाटील हे करणार आहेत. विश्वस्त बाळकृष्ण आरडे व यतीन शहा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
या सप्ताहात नितीन महाराज काकडे, मधुसूदन महाराज शास्त्री, सागर महाराज पडवळ, यतीराज महाराज लोहार, गणेश महाराज कारले, सच्चिदानंद महाराज कांबेकर, प्रकाश महाराज शिंदे यांची प्रवचन सेवा होणार आहे; तर नितीन महाराज काकडे, मधुसूदन महाराज शास्त्री, तुषार महाराज दळवी, यतीराज महाराज लोहार, गणेश महाराज कारले, सच्चिदानंद महाराज कांबेकर, चिदंबरेश्वर किसन महाराज साखरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. डॉ. यशोधन महाराज साखरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. याशिवाय ज्ञानदान, सेवा व अन्नदान सेवेचेही आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दररोज विविध गावांमध्ये भजनाचा जागर कार्यक्रम होणार आहे. तसेच दररोज महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT