पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वर्षावास कार्यक्रमाबाबत बौद्ध बांधवांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बौद्ध बांधवांचा आषाढ पौर्णिमेपासून (ता. 5) सुरू होणाऱ्या वर्षावासाला स्थगिती देण्यात आली आहे. 'बुद्धविहारांमध्ये एकत्र जमू नका. त्याऐवजी प्रत्येक बौद्ध बांधवांनी घरीच धार्मिक साहित्याचे वाचन करत, कोविड-19 च्या लढ्यात हातभार लावावा,' अशा सूचना भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य कार्यकारिणीने दिल्या आहेत. त्यामुळे 64 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच कोरोनामुळे वर्षावास कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. 

आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि आश्‍विन पौर्णिमेला समाप्त होतो. बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. भगवान बुद्धांच्या अनुयायांकडुन या वर्षावासाच्या काळात निरनिराळे धार्मिक उपक्रम राबविले जातात. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय शाखेकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार बुद्धविहारांमध्ये प्रवचन मालिका व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेशी संबंधित असलेली शहरातील जवळपास 80 बुद्धविहारे बंद ठेवण्यात आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक पार पडली. राज्याचे अध्यक्ष उत्तम बोऱ्हाडे आणि सरचिटणीस आनंद सातपुते यांनी कार्यकारिणी सदस्यांशी झालेल्या चर्चेनुसार, यंदा वर्षावास प्रवचन मालिका आयोजित करण्यास स्थगिती दिली आहे. त्यानुसार कोरोनामुळे प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक पातळीवर उपोसथ ग्रहण करण्याच्या सूचना दिल्या असून, पहाटे पाच वाजल्यापासून दिवसभराचे वेळापत्रक तयार करून दिले आहे. त्यामध्ये बुद्धवंदना, धार्मिक ग्रंथाचे वाचन जेवणाची वेळ, पंचशील व अष्टांग मार्गाचा अवलंब अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील एका बुद्ध लेणीवर वर्षावासाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. राज्य कार्यकारिणीकडून मिळालेल्या सूचनेनुसार, यंदा जुन्नर येथील लेणीवर आयोजित केलेला हा कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच सर्व शहर व शाखा पदाधिकाऱ्यांना वैयक्‍तिक पातळीवर कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत." 
- राधाकांत कांबळे, सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT