Vedika-Shinde 
पिंपरी-चिंचवड

वेदिकाला उपचारासाठी हवेत दानशुरांचे हात

सकाळवृत्तसेवा

भोसरीतील चिमुरडीला जन्मतः दुर्मीळ आजार; नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन
भोसरी - आठ महिन्यांच्या चिमुरडीला जन्मापासूनच मानेची व शरीराची हालचाल करता येत नाही. तिला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाइप’ या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. उपचारासाठी १८ कोटींचे इंजेक्शन अमेरिकेतून आणण्यासाठी खर्च येणार आहे, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.  

भोसरीतील सौरभ शिंदे यांच्या कुटुंबात आठ महिन्यांपूर्वी वेदिकाने जन्म घेतला. तिला इतर मुलांप्रमाणे शरीराची हालचाल करता येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे फिजिओथेरपीमुळे तिला थोडाफार फायदा झाला; पण त्रासापासून मुक्तता झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना या आजाराबाबत काहीच कळत नव्हते. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने पंधरा दिवसांपूर्वी तिच्या रक्ताचे नमुने चेन्नईला पाठवले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तो अहवाल दोन मार्चला आल्यानंतर वेदिकाला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी’ हा आजार झाल्याचे कळाले. यावर काय उपचार करता येतील, यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. उपचाराकरिता अमेरिकेतून इंजेक्शन आणण्यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च येईल, असे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. 

सध्या वेदिकावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी त्यांनी मिलाप क्राउड फंडिंग या वेबसाइटवर दानशूर संस्था व व्यक्तींना निधी जमा करण्याचे आवाहन केले आहे. वेदिकाचे वडील लघुउद्योजक व आई गृहिणी आहेत. तिच्या वडिलांच्या व्यवसायावर कोरोनामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांची १८ कोटी रुपये जमा करण्यासाठी पळापळ सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईतील तीरा कामत या चिमुकलीला हा आजार झाला होता. त्यावेळी तिला सोळा कोटींचे इंजेक्शन दिले होते. तशीच परिस्थिती वेदिकावर आली असून, तिला हे इंजेक्शन येत्या दोन महिन्यांत दिले पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले. 

डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘‘वेदिकाला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी’ हा जेनेटिक आजार झाला आहे. यामुळे रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात. तसेच, हळूहळू श्‍वास घेण्याची ताकद कमी होते. त्यामुळे वेदिकाला व्हेंटिलेटरवर 
ठेवावे लागले. पूर्वी या आजारात उपचार नसल्याने मुलांचे आयुष्य दोन ते चार वर्षेच होते. आता यावर अमेरिकेत ‘जीन थेरपी’ सुरू झाली आहे. यासाठी पंधरा ते अठरा कोटींचे झोलगेस्मा इंजेक्शन मागवावे लागते.’’

कुटुंबीय व मित्र परिवारांनी सोशल मीडियावर वेदिकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आम्ही मदतीसाठी नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासह इतरही ठिकाणी प्रयत्न करत आहोत. वेदिकाच्या उपचारासाठी येणारा खर्च ऐकून कोणाचाच विश्‍वास बसत नाही. तिला वाचविण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, पक्ष, राजकीय नेते आदींनी मदत करावी. काही कंपन्यांनी सीएसआरमधून मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 
- सौरभ शिंदे, वेदिकाचे वडील

मदतीसाठी बँकेचा तपशील
नाव : सौरभ मुरलीधर शिंदे
(मोबाईल क्र. ९९२२०९८८८५)
बँकेचे नाव : एचडीएफसी बँक (टेल्को रोड भोसरी)
खाते क्र. : ५०१०००९७८१९२१२
आयएफएससी क्र. : HDFC0003841

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी भ्रष्टाचार प्रकरणा विरोधात धुळ्यात महाविकास आघाडी आक्रमक

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT