ft.jpg 
पिंपरी-चिंचवड

आकुर्डी, भोसरीतील भाजी मंडईबाबत मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः शहरातील पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव भाजी मंडई पाठोपाठ आकुर्डी आणि भोसरी गावठाणातील भाजी मंडईला चालू महिन्याअखेरपर्यंत काही अटी-शर्तींवर महापालिकेने परवानगी दिली. त्यानुसार, आकुर्डी, भोसरीतील मंडईंत सम-विषम पद्धतीने निम्म्या गाळ्यांमार्फत दैनंदिन भाजीपाला विक्रीचे व्यवहार सुरु झाले. 

सुमारे दीड महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख भाजी मंडई बंद करुन त्या 46 ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातील सुमारे 30 मंडई प्रत्यक्षात सुरु झाल्या. त्यानुसार, काही दिवस तेथे भाजी खरेदीसाठी नागरिक जात होते. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर तेथे भाजी विक्री करणे शक्‍य नसल्याचे सांगत चिंचवडगाव भाजी विक्रेत्यांनी मूळ मंडईत दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाकडे मागितली होती.

दरम्यान, त्यानुसार तेथील भाजी मंडई सुरु झाली होती. दोन दिवसांपूर्वी पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईही सुरु झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवकीला अजून परवानगी मिळालेली नाही. 

आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडई आणि भोसरीतील संत ज्ञानेश्‍वर मंडई देखील चालू झाल्या. नवीन इमारतीजवळील शेडमध्ये संत ज्ञानेश्‍वर मंडई चालू झाली आहे. मंडई सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालू ठेवावी, मंडईतील गाळेधारक आणि ग्राहकांचे शरीराचे तापमान तपासले जावे, सॅनिटायझर लावून प्रवेश दिला जावा, सम-विषम पद्धतीने निम्मे गाळे चालू ठेवले जावेत. मंडईचे दोन्ही मार्ग खुले करुन एका बाजूने आत आणि दुसऱ्या बाजूने ग्राहकांना बाहेर जाण्याचा मार्ग असावा, आदी अटी-शर्ती महापालिकेने घातल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परवानगी केवळ 30 जूनपर्यंतच ! 
मंडई सुरु करण्याची परवानगी देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी मंडई केवळ 30 जूनपर्यंतच सुरु राहिल, असे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यास परवानगी तत्काळ रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी, तरीही टॅरिफ नाही! ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, पत्रकारांना बेदम मारहाण; Video Viral

Who Is Deepa Bhati : तीन मुलांची आई, वयाच्या ४० व्या वर्षी यूपी पीसीएसमध्ये यश; लग्नानंतर १८ वर्षांनी दीपा भाटी बनल्या अधिकारी

Hasan Mushrif On Gokul Election : 'गोकुळ'च्या राजकारणात नवा ट्विस्ट! मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार अध्यक्षपदाची सूत्रे, मंत्री हसन मुश्रीफांनी काय केलं जाहीर?

Equal Pay Demand: समान काम, समान वेतन द्या...न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

SCROLL FOR NEXT