पिंपरी-चिंचवड

पिंपरी महापालिकेत राडा; भाजप नगरसेवकाला मारहाण?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापलिका सभा संपल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या अँटी चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मारहाण कोणी केली याबद्द्ल रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झालेली नव्हती. तसेच, या बाबत भाजपचा कोणताही पदाधिकारी बोलण्यास तयार नाही.

मारहाणीचा प्रकार आज (सोमवार) सायंकाळी घडला. महापालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच अँटी चेंबर आहे. तिथे मडिगेरी बसले होते. यावेळी अचानक जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. ती ऐकून काही पदाधिकारी, नगरसेवक धावले. यावेळी रक्तदाब वाढुन मडिगेरी खाली कोसळले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना तत्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वादाचा विषय भूसंपादन

गेल्या वर्षापासून भूसंपादनाचा विषय स्थायीत प्रलंबित आहे. मडिगेरी अध्यक्ष असल्यापासून  विषय सतत तहकूब आहे. खासगी वाटाघाटीने भूसंपादनाऐवजी टीडीआरनुसार मोबदला देण्यास मडिगेरी आग्रही आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांचे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही, असे जमीन मालकांचे म्हणणे आहे. हेच मूळ कारण असल्याचे काहींनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या बनावट प्रति बाजारात

SCROLL FOR NEXT