सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’  sakal
पिंपरी-चिंचवड

शिवडे, आय एम सॉरी’ नंतर 'सहावीला पिंपरी चिंचवडला आलो'ची चर्चा

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचाराची राळ उडवून देत आहेत

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील हटके पोस्टर आणि फ्लेक्सबाजी काय थांबता थांबत नाहीये. याआधी ‘शिवडे, आय एम सॉरी’ अशा पोस्टरने खळबळ माजवली होती. आता सध्या असेच एक बॅनर शहरात झळकले आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे वाक्य लिहिलेले पोस्टरने सगळ्यांनाच विचार करायला लावले आहे. शहरातील नेहरूनगर - यशवंतनगर रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरूआहे .शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर लावलेलेही अशी पोस्टर्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे शहरात पोस्टरबाजीची नेहमीच चर्चा सुरु असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचाराची राळ उडवून देत आहेत.

तर दुसरीकडे विविध गृहप्रकल्प, विविध व्यावसायिक आपला ब्रँड अल्पावधीत सर्वतोमुखी व्हावा, यासाठी असे उत्कंठावर्धक बॅनर व पोस्टरबाजी करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परिणामी शहरात हटके फलक लावण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक बॅनर सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक राजकीय वतुर्ळातदेखील चर्चा रंगली आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असा नारा देत एका व्यावसायिकाने जाहिरातबाजी सुरू केली आहे. अशा प्रकारे जाहिरात करून अनेकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. कोण आहे, काय असेल, असाच प्रश्‍न अनेकांना पडला आहे. परिणामी, जाहिरातीत वापरण्यात येणाऱ्या व्यक्‍ती, त्यांच्या तोंडी घातलेले वाक्य हा नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील चर्चेतील पोस्टर

पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ (‘SHIVDE I AM SORRY') या पोस्टरची चर्चा झाली होती. त्यानंतर पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून पक्षांतर्गत कलह उघड केला होता. त्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षामधील कलह लपून राहिला नव्हता. तसेच माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा आशयाचे फलक शहरभर लावून सत्ताधारी भाजपच्या आश्‍वासनाची चिरफाड केली होती. वादग्रस्त प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आलेले महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त का केले ? असा सवाल आयुक्त राजेश पाटील यांना फ्लेक्सच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. असे फ्लेक्स ‘साठे परिवार आणि पिंपरी-चिंचवडकरां’च्या वतीने शहरात झळकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT