ganpati sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ऑनलाइन दर्शन घ्या; गर्दी टाळा

गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा करावी,’ असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: ‘गर्दी टाळण्यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा करावी,’ असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त नियोजन बैठक सोमवारी महापालिका मुख्यालयात झाली. त्यात पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते. महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘पोलिस ठाण्यांनिहाय मंडळांच्या बैठका घेतल्या जातील. घरगुती गणेश मूर्तींची संख्या लक्षात घेऊन मूर्तिदान स्वीकारणारे रथ उपलब्ध असणे आवश्यक आहे.’’ पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले..

  • नियमांचे काटेकोर अंमलबजावणीसाठी महापालिका व पोलिस प्रशासन समन्वय साधून काम करणार

  • बाजारपेठा व गणेश मंडळांजवळ गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

  • गणेश मंडळांसोबत प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बैठकांचे नियोजन करावे

  • पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे

  • प्रभागस्तरावर महापालिका कर्मचारी व पोलिसांचा समावेश असलेली फिरती पथके नियुक्त करणार

  • मूर्तिदान स्वीकारणाऱ्या वाहनांची योग्य सजावट करावी

  • गणेशोत्सव नियमांबाबत जागृतीसाठी विशेष प्रयत्न करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT