पिंपरी-चिंचवड

एसटीने मालवाहतुकीची जबाबदारी उचलली; मात्र, वल्लभनगर आगाराला... 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूकीचीही जबाबदारी उचलली आहे. एसटीमार्फत जवळपास सात टनापर्यंतची मालवाहतूक करता येणार आहे. त्यादृष्टीने महामंडळाच्या वल्लभनगर एसटी आगाराने भोसरी एमआयडीसीमध्ये उद्योग-कारखान्यांपर्यंत जाऊन मालवाहतुकीसाठी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन उद्योजकांना केले आहे. 

मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून एसटी स्थानकांवरून सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, जास्त आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून महामंडळाने एसटीद्वारे मालवाहतुक सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. पुण्यातील काही आगारामधून मालवाहतूक सुरु झाली आहे. मात्र, वल्लभनगर एसटी आगाराला अद्याप माल वाहतुकीच्या मागणीची प्रतीक्षा आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वल्लभनगर आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, "भोसरी एमआयडीसीमधील उद्योजकांनी एसटीच्या मालवाहतूक सुविधेचा उपयोग करावा, यासाठी आम्ही 10 ते 15 उद्योजकांची भेट घेऊन चर्चा केली आहे. एसटीकडून प्रतिकिलोमीटर जवळपास 36 रुपये दराने ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.'' या आगारामार्फत मालवाहतुकीसाठी सध्या एक ट्रक उपलब्ध करण्यात येणार आहे. माल वाहतुकीबाबत मागणी वाढल्यास एसटी गाड्यांमध्ये मालवाहतूकीसाठी आवश्‍यक ते बदल करुन त्यांचा वापर केला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

SCROLL FOR NEXT