Food Donation for warkari by wakad citizens sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad News : वाकडकरांचे सलग तेराव्या वर्षी वारकऱ्यांसाठी महापंगतीचे आयोजन; १५००० वारकऱ्यांना अन्नप्रसाद

समस्त वाकड ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने सलग तेराव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान सेवा देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

वाकड - समस्त वाकड ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने सलग तेराव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान सेवा देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे येळीव (सोलापूर) मधील मांडवीच्या ओढ्याजवळ महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही तब्बल पंधरा हजारांहून अधिक वारकऱ्यांना अन्नप्रसाद सेवेचा लाभ देण्यात आला.

शुक्रवारी (ता. २३) रात्री दत्त मंदिर परिसरात माणसांची गर्दी जमू लागली. हळूहळू ही गर्दी हजारांवर गेली. महापंगतीसाठी अन्नदानाचे साहित्य भरलेले दोन टेम्पो व अन्य तीस मोटारीमध्ये शंभरहून अधिक ग्रामस्थ सोलापूर जिल्ह्यातील येळीव (ता. माळशिरस) गावी रवाना होण्यासाठी सज्ज झाले.

पूजा करून म्हातोबाचा चांगभलं या जयघोषाणी अवघा वाकड दत्तमंदिर परिसर दुमदुमला. याच रात्री माऊलींच्या पालखीचा नातेपुतेत मुक्काम होता. शनिवारी (ता. २४) पहाटे ही सर्व मंडळी येळीव येथे पोहचले. अन शेकडो हातांची जेवण बनविण्याची लगबग सुरू झाली.

माऊलींच्या पालखीच्या नातेपुते येथील (सोलापूर) मुक्कामानंतर दुपारी बाराच्या सुमारास सदाशिव नगर येथे रिंगण होते. यानंतर दुपारचे भोजन व विसाव्यासाठी मांडवी ओढ्याला पालखी थांबते याचवेळी मध्यान्ह: भोजन वारकऱ्यांना दिले जाते.

यंदा व्हेज बिर्याणी, बुंदी अन पाण्याची बॉटल वाटण्यात आले. संपूर्ण दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंधरा हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला. माऊलींच्या रथापुढे असणारी वाकड येथील निकम दिंडी क्रमांक १६ मधील वारकरी देखील या ठिकाणी विसाव्याला थांबत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT