wakad yatra sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad Hinjewadi News : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात अवघी आयटी दुमदुमली..!!

आयटी नगरी हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत म्हातोबा देवाची बगाड यात्रा गुरुवारी (ता. ६) सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सकाळ वृत्तसेवा

आयटी नगरी हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत म्हातोबा देवाची बगाड यात्रा गुरुवारी (ता. ६) सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

हिंजवडी - आयटी नगरी हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत म्हातोबा देवाची बगाड यात्रा गुरुवारी (ता. ६) सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरवर्षीच्या तुलनेत भक्तांची अलोट गर्दी अन बगाड रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हे यंदाच्या बगाड मिरवणूकीचे वैशिष्ट्ये ठरले. यंदा गळकरी होण्याचा मान किशोर ज्ञानोबा जांभुळकर यांना मिळाला.

चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला म्हातोबा देवाची यात्रा असते. गुरुवारी वाकडहून ग्रामस्थ गळ घेऊन होळीच्या पायथ्याला आल्यानंतर किसन साखरे पाटील यांनी गळाचा मानकरी पुकारला. यंदा खांदेकऱ्यांचा मान ऋषीकेश राजेंद्र साखरे व दिनेश सुरेश साखरे यांना मिळाला. खांदेकऱ्यांनी म्हातोबा मंदिरात गळकऱ्याला आणताच स्नान घालण्यात आले.सुहासिनिंनी नवरदेवाप्रमाणे हळदी-कुंकवाचा मळवट भरला. पारंपरिक देवाचा, फेटा उपरणे, पंचा असे वस्त्र नेसवून मारुतीचे दर्शन करून गळकऱ्याला होळीच्या पायथ्याशी आणले.

होळी पायथ्याला साखरे पाटील आणि सुतार कुटुंबातील गराडे यांनी मानाप्रमाणे गळकऱ्याला गळ टोचला. गळ टोचल्यानंतर पाणी पाजून मार्गस्थ करून गळकऱ्याला बगाडावर बसविण्यात आले यावेळी चांगभलेच्या गजराने जणू आसमंत दुमदुमले. हुलावळे परिवाराला काठीचा मान असतो. भंडारा-खोबऱ्याची उधळण करत चांगभले, पैस...पैस च्या गजरात भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबळ वस्ती, वाकड गावठाण या मार्गे गाठभेट घेत बगाड मिरवणूक वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात पोहचताच सांगता झाली.

रथावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

यंदाच्या बगाड रथावर व मिरवणूकीवर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब उर्फ तुकाराम विनोदे परिवाराच्या वतीने पुष्प वृष्टी करण्यात आली. हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो हात सरसावले होते. विनोदे कुटुंबीयांनी होळी पायथ्यावरील बगाड रथावर आणि बगाड मिरवणूक मार्गावर पुष्प वृष्टी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT