wakad rain update sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad Rain Update : वाकडमधील रस्त्यांवर पाणी अन वाहतूक कोंडी; नागरिकांत समाधान

भूमकर चौक भुयारी मार्गात नेहमी प्रमाणे पाणी साठल्याने वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

वाकड : थेरगाव, वाकड, हिंजवडी परिसरात शनिवारी (ता. २४) सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने काहिसा काळोख पसरला होता. साडे दहाच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली.

अर्ध्या तासाने ही रिमझिम थांबली आणि थेट एकच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल पाऊण तास धो-धो बरसणाऱ्या या पावसामुळे या भागातील रस्त्यावर जागोजागी पाणीच पाणी जमा झाल्याचे चित्र होते.

डांगे चौक हिंजवडी रस्त्यावरील कस्तुरी चौकात विनोदे नगरकडे जाण्याच्या रस्त्यावर दीड फूट पाणी जमा झाले होते या तळ्यातून वाट शोधताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने काही प्रमाणात येथे वाहतूक कोंडी झाली होती.

भूमकर चौक भुयारी मार्गात नेहमी प्रमाणे पाणी साठल्याने वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेत पुन्हा सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आगमन केल्याने वातावरणात गारवा पसरला होता. मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाने लावलेल हजेरी अन सर्वांची उकाड्यातून केलेली सुटका यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

Ajinkya Rahane Pension: अजिंक्यने निवृत्ती घेतली, BCCI कडून त्याला किती पेन्शन मिळणार? निवृत्तीवेतन थांबवले जाईल, जर त्याने...

Crime News: लपंडाव खेळताना पाशवी कृत्य! शेतात नेलं अन्...; ९ वर्षांच्या मुलीवर ५ जणांचा अत्याचार

August 2026 Calendar: स्वातंत्र्य दिन, गटारी अमावस्या, नागपंचमी ते रक्षाबंधन; जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ प्राधिकरणाची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT