Crime
Crime 
पिंपरी-चिंचवड

माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल; धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला अटक

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल आणि तुम्हाला केसमध्ये अडकवेन’ अशी तरुणीला व तिच्या घरच्यांना धमकी दिली. तसेच तरुणीचे लग्न ठरलेल्या सासरच्या लोकांना तिचे फोटो व मेसेज पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

नागेश किशनराव टंगाटूरे (वय ३०, रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नागेश याने ‘मला तू आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत लग्न करशील का’ असे वारंवार विचारून तरुणीला त्रास दिला. तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी नागेश याला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने ‘माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी माझा जीव देईल व तुम्हाला केसमध्ये अडकवेन. मी जीव देणार व त्याला तुम्ही सर्वजण जबाबदार राहणार’ अशा धमकीचे मेसेज पाठवले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तरुणीचे लग्न ठरलेल्या सासरच्या नातेवाईकांना देखील तरुणीचे फोटो व मेसेज पाठवून तिचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. सासरच्या पाहुण्यांना देखील आरोपीने बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT