पिंपरी-चिंचवड

VIDEO : मावळात तिसऱ्या दिवशीही वीज खंडित; पाण्यासाठी महिलांची पायपीट!

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (पुणे) : निर्सग चक्रीवादळामुळे मावळात तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. परिणामी पाण्यासाठी महिलांना विहिर, हातपंप, नदी व धरणावर पायपीट करावी लागत आहे. अक्षरश: नदीची चढण चढून महिला डोक्यावर दोन किंवा तीन हंडे भरून पाणी आणत होत्या. 

खडकाळा शहरातील काही रहिवाशांनी टँकरने पाणी मागवले. 
निसर्ग चक्रीवादळामुळे वीजयंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. आजच्या (शनिवार) तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठा खंडित आहे. गावोगावच्या पाणीपुरवठा योजना बंद असल्या तरी, पिण्यासाठी, कपडे आणि अंघोळीला पाण्याची सोय व्हावी, यासाठी परिसरातील महिलांनी कंबरेला पदर खोचून पाण्यासाठी भल्या सकाळी घर सोडले. गावच्या जवळच्या विहिरी, हातपंप आणि गावापासून दूर असणाऱ्या इंद्रायणी, कुंडलिका नदीचे काठ, आंद्रा, ठोकळवाडी, सोमवडी, पवना धरणाचा परिसर पाण्यासाठी गर्दीने फुलाला होता. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेजारच्या गावातील मैत्रिणी, सासू-सूना ,जावा-जावा, नणंद, भावजया सगळ्या जणी सोबतीने पाण्याला गेल्या. डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन जाणाऱ्या लेकी-सूना चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा ऊहापोह करीत होत्या. शेतीच्या कामाचे दिवस असल्याने महावितरणने वीजपुरवठा तातडीने सुरू करावा म्हणजे पाणीपुरवठा योजना सुरू होतील, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ताराबाई शेलार म्हणाल्या, की दोन दिवस झाले वीजपुरवठा बंद आहे, त्यामुळे डोक्यावर पाणी वाहून आणते. महावितरणने वीजपुरवठा सुरू करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT