pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

मराठवाडा विकासासाठी संघटित व्हावे

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे शिक्षितवर्गाला आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘मराठवाडा हा खऱ्या अर्थाने तेव्हाच मुक्त होईल, जेव्हा असाक्षरता, गरिबी, सामाजिक, पाण्याची समस्या यांपासून मुक्ती मिळेल. त्यासाठी सर्व मराठवाड्यातील शिक्षित वर्गाने संघटित होऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भोसरी येथील अराईज इंटरनॅशनल स्कूल व मराठवाडा मित्रमंडळ परिवार यांच्या संयुक्‍त विद्यमाने ७४ व्या मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश व १९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सबनीस होते. पुणे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, माजी गटनेते एकनाथ पवार उपस्थित होते. यावेळी अरुण पवार (वृक्षमित्र पुरस्कार), श्रीराम हांडीबाग (उद्योजक पुरस्कार), संजू राम माने (कोरोना योद्धा पुरस्कार), प्रा. डॉ. गजानन वाव्हळ (समाज प्रबोधनकार), सुनील जाधव (सामाजिक पुरस्कार), दत्तात्रेय इंगळे (समाजसेवा पुरस्कार) यांना ‘मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी आमदार कव्हेकर म्हणाले, ‘‘भारत देश स्वतंत्र्य झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्या प्रमाणात मात्र मराठवाड्याचा विकास झालेला नाही. त्यासाठी मराठवाड्याच्या नेतृत्वाने कुठलाही प्रयत्न केलेला नाही. परिणामी मराठवाडा हा दुष्काळवाडा झालेला आहे. यासाठी मराठवाडा विकास मंडळाची स्थापना करून तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे.’’

पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘निजामशाहीची जुलमी राजवट सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व अनेक स्वातंत्र सेनानी यांच्या अथक परिश्रमाने व बलिदानाने मोडून काढली. या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे.’’ प्रकाश इंगोले यांनी प्रास्ताविक केले. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य जितेंद्र खैरनार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT