School esakal
पिंपरी-चिंचवड

कधी सुरू होणार शाळा

कोरोना व्हायरस आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून जवळपास २ वर्षे पहिलीपासूनच्या शाळा बंदच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राज्य सरकारने पहिल्या वर्गापासून चौथी आणि सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय १ डिसेंबरपासूनच लागू केला. परंतु, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे शहरांमध्ये अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून आदेश प्राप्त झाले नसल्याने हा निर्णय आणखी लांबणीवर टाकला आहे.

कोरोना व्हायरस आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून जवळपास २ वर्षे पहिलीपासूनच्या शाळा बंदच आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर १ डिसेंबर पासून राज्य सरकारने पहिलीपासून शाळा सुरू करण्यास मंजुरी देणारे पत्रक काढले असले तरीही त्याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे.

ज्या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या नाहीत त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू कराव्यात असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यामुळे अद्याप स्थानिक प्रशासनावर कुठल्याही प्रकारच्या सुचना मिळाल्या नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. आता लवकरच शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापालिका शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

दरम्यान, शहरात पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. याविषयी आधीच स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. मात्र, १५ डिसेंबरला यासाठी एक बैठक घेतली जाईल. कोरोना आणि या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनवर एक आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT