Chandrakant Patil  esakal
पिंपरी-चिंचवड

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा कोण? समर्थकांचं चिंचवड पोलीस ठाण्यात आंदोलन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाचं नाव समोर आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. त्याचबरोबर तो कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, त्याच्या समर्थकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनबाहेर दादागिरी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Who threw ink on Chandrakant Patil Protest by supporters at Chinchwad Police Station)

एबीपी माझाच्या माहितीनुसार, मनोज गरबडे असं शाईफेक करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो आंबेडकरी संघटनांपैकी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मनोजसह इतर दोघांना असं तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर या तिन्ही आरोपींचे समर्थक मोठ्या प्रमाणावर चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी सुरु असल्याचा आरोप केला.

पोलिसांचं म्हणणं काय?

ज्या लोकांनी शाई फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेल्या त्यांच्या समर्थकांना आम्ही हे समजावून सांगत आहोत की, त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई करण्यात येईल ती आम्ही करणार आहोत.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

शाईफेक करणाऱ्यांच्या समर्थकांचं म्हणणं काय?

राज्यपाल कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, त्यामुळं ही शाईफेकीची घटना घडली आहे. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलेलं असताना भाजपचे गुंड पोलीस स्टेशनबाहेर आले असून त्यांना बाहेर काढा म्हणत होते. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. आम्ही यासाठी इथं आलो आहोत की, शाईफेकणाऱ्यांवर जी कारवाई होईल ती होईल. पण इथं भाजपच्या गुंडांनी येऊन पोलिसांसमोर येऊन दादागिरी केली. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT