Breast Cancer Sakal
पिंपरी-चिंचवड

Breast Cancer : दुर्लक्षामुळे वाढतोय स्तनाचा कर्करोग

कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये १४ ते १८ टक्के रुग्ण हे स्तनाचा कर्करोग झालेले आढळून येत आहेत. आपल्या देशात दर २१ महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अनेकदा केवळ दुर्लक्ष किंवा लाजेखातर महिला याकडे लक्ष देत नाहीत. याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी व महिलांनी याबाबत सजग व्हावे, यासाठी ऑक्टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.

कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये १४ ते १८ टक्के रुग्ण हे स्तनाचा कर्करोग झालेले आढळून येत आहेत. आपल्या देशात दर २१ महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे, तर परदेशांतील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मात्र अनेकदा महिला याबाबत उघडपणे चर्चा करणे टाळतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढत असल्याचे कर्करोगावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

साधारण ३५ ते ६५ वर्षे वयोगटांतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळून येतो. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी वयातील महिलांमध्येही हे प्रमाण वाढत आहे. मात्र, लवकर निदान व वेळेत योग्य ते उपचार घेतल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असेही तज्ज्ञ सांगतात.

स्तन्यपानाने धोका कमी

ज्या महिला आपल्या बाळाला स्तन्यपान करतात, त्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे जर स्तनाच्या कर्करोगापासून आपला बचाव करायचा असेल, तर मातांनी आपल्या बाळाला स्तन्यपान करावे, असेही डॉक्टर सांगतात.

आरोग्याची योग्य काळजी घेतली तर स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. अनेकदा स्तनामध्ये आलेली गाठ ही वेदनारहित असते, त्यामुळे महिला याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा वेळी लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास हा कर्करोग पूर्ण बरा होतो. तो बरा झाल्यानंतरही रुग्णाने पाच वर्षांपर्यंत वेळोवेळी आपली वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.

- डॉ. महेश पवार, कर्करोग तज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड

स्तनाचा कर्करोग होण्याची कारणे

  • वजन जास्त असणे व व्यायामाचा अभाव

  • आनुवंशिकता

  • लहान वयात पाळी सुरू होणे

  • उशिरा रजोनिवृत्ती होणे

  • वंध्यत्व

  • धूम्रपान करणे, दारूचे व्यसन

  • बदललेली जीवनशैली

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

  • स्तनामध्ये गाठ येणे

  • स्तनाचा आकार बदलणे

  • स्तनातून रक्तस्राव होणे

  • बगलेत गाठ येणे

  • स्तनावरील त्वचेचा रंग बदलणे

असा करावा बचाव

  • वयाच्या पंचविशीनंतर दर महिन्याला घरीच स्तनाची तपासणी करणे

  • कुटुंबातील व्यक्तीला कर्करोग झाला असल्यास नियमित वैद्यकीय तपासणी करावी

  • चाळिशीतील महिलांनी वर्षातून एकदा मॅमोग्राफी करून घ्यावी

  • योग्य आहार व व्यायाम करावा

  • वजन आटोक्यात ठेवावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT