sinhgad express fighting sakal
पिंपरी-चिंचवड

Womens Fighting : सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिलांची हाणामारी वाढली, कारण आलं समोर..

महिलांच्या बोगीत जागा मिळण्यावरून (सीट) हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे ते मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण व महिला पासधारकांच्या बोगींची संख्या कमी केली आहे. परिणामी, महिलांच्या बोगीत जागा मिळण्यावरून (सीट) हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. या आठवड्यात हाणामारीच्या दोन घटना घडल्याचे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. याप्रकरणी पासधारक महिलांनी कर्जत रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दिली आहे.

नोकरी, व्यवसायानिमित्त सिंहगड एक्स्प्रेसने दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पिंपरी-चिंचवडमधून दररोज सुमारे दीड हजार नोकरदार प्रवास करतात. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र बोगीची मागणी होती. त्यानुसार काही दिवस स्वतंत्र बोगी मिळाली. त्याचप्रमाणे पासधारक महिलांसाठी स्वतंत्र व सर्वसाधारण बोगींची सुविधा दिली. मात्र, कोरोनानंतर दोनही बोगी कमी केल्या. त्यामुळे रोज कामावर जाताना पासधारक महिलांना जागा मिळण्यावरून इतर प्रवाशांचे वाद होत आहेत. अनेकदा त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. सध्या एकच बोगी आहे. त्यामध्ये पासधारक महिला आणि इतर सर्व प्रवासी बसतात. पासधारक महिलांसाठी स्वतंत्र बोगींची मागणी आहे.

ठाणे, कल्याणला त्रास

मुंबई सीएसटीवरून सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये ठाणे आणि कल्याणचे प्रवासी बसतात. त्यांना लोकलची सोय असतानाही जबरदस्तीने बसतात. याबाबत जाब विचारल्यास दादागिरी करून वाद घालतात, मारहाण करतात, असे शहरातील महिला प्रवाशांनी सांगितले.

अशा घडल्या घटना...

एक - गुरुवारी (ता. ६) मुंबईहून पुण्याला येताना

दोन - सोमवारी (ता. १०) पुण्याहून मुंबईला जाताना शिवाजीनगर स्टेशन सिंहगड एक्सप्रेस डी-११

तीन - मंगळवार (ता. ११) सायंकाळी ४.३७ वाजता दादर ते ठाणे दरम्यान प्रगती एक्स्प्रेस

हाणामारीबाबत रेल्वे प्रशासनास अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. महिलांच्या बोगीत पुरुषही बसतात. सिंहगड एक्सप्रेसच्या सर्वसाधारण व महिलांसाठीची बोगी कमी केल्याने घटना वाढल्या आहेत. बोगी पूर्ववत कराव्यात.

- इक्‍बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी-चिंचवड

ठाण्याच्या हद्दीत महिलांमध्ये भांडणे झाली आहेत. या भांडणात एकीच्या चेहऱ्यावर नखे ओरबडली गेली आहेत. त्यांचा तक्रार अर्ज ठाणे पोलिस स्टेशनकडे पाठवला आहे.

- संभाजी यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT