Workers' union office bearers and workers staged agitation in Pimpri on Thursday to protest against the changes made in the Farmers and Labor Act. 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी - शेतकरी व कामगार कायद्यातील बदलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मंगेश पांडे

पिंपरी : केंद्र सरकारने शेतकरी व कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी गुरूवारी पिंपरीत आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कामगार संघटनेचे पदाधिकारी कैलास कदम, केशव घोळवे, अजित अभ्यंकर, इरफान सय्यद, मारुती भापकर, संजीवन कांबळे, संदीप भेगडे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा, साथीचे रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगार संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक एकत्र जमले. मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ झेंडे, फ्लेक्‍स, बॅनर घेऊन तसेच घोषणा देत निषेध व्यक्त केला. 

यावेळी प्रशासनाचे आदेश उल्लंघन करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू असतानाही एकत्र जमून मानवी जिवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच रहदारीसही अडथळा निर्माण केला. यामुळे पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT