YCM-Hospital sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : मुदतपू्र्व जन्मलेल्या बालकाला मृत घोषित करून बनवला स्मशान दाखला

वायसीए रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुदतपू्र्व जन्मलेल्या बालकाला मृत घोषित करून त्याचा स्मशान दाखला तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दिघी येथील २३ वर्षीय महिला मंगळवारी (ता.२३ जुलै ) वायसीएम रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेच्या गर्भाची वाढ खुंटल्याने तिच्या प्रकृतीस धोका निर्माण झाला होता. अशावेळी तिची मूदतपूर्व प्रसुती करण्यात आली. मात्र, ३० आठवड्यांचे नवजात बालक जन्माला आल्यानंतर लगेच त्याला मृत घोषित करून स्मशान दाखला देखील बनविण्यात आला.

दरम्यान, बाळाची हालचाल जाणवल्याने बालकास एनआयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस हे बाळ वेंटिलेटरवर होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.६ जुल) या बालकाचा मृत्यू झाला.

'सदर महिलेच्या बाळाची वाढ खुंटल्याने तिच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या कारणास्तव तिचा गर्भपात करण्याचे डॉक्टरांनी सुचविले होते. मात्र, ही महिला ३० आठवड्यांची गर्भवती असल्याने ही प्रक्रिया प्रसुतीव्दारे करण्यात आली. या बाळाचे वजन केवळ ६०० ग्रॅम होते. अशावेळी बालकाची पूर्ण वाढ न झाल्याने ते बचावणे अवघड असते. तसेच हे बाळ प्रसुतीनंतर रडले नाही आणि त्याचे ठोकेही लागत नव्हते.

त्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, बालकाला आई वडीलांकडे सोपवण्याच्या वेळीच त्याची हालचाल जाणवल्याने तातडीने या अर्भकास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.' अशी माहिती यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी याच वायसीएम रुग्णालयात मूदतपूर्व जन्मलेल्या बालकावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले होते.त्यामुळे हे बालक जीवंत असल्याचे वेळीच लक्षात आले असते तर परिस्थिती वेगळी असती असेही बोलले जात आहे.

'प्रसुतीनंतर हे बाळ रडले नाही त्यामुळे त्यास मृत घोषित करण्यात आले.मात्र त्यानंतर त्याच्या हातापायाची हालचाल जाणवल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. या दरम्यान शिफ्ट बदलल्याने दोन विभागांमधील कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ राहिला नाही त्यामुळे स्मशान दाखला तयार केला गेला.'

- डॉ राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT