YCM-Hospital 
पिंपरी-चिंचवड

वायसीएम लॅब २४ तास कार्यान्वित : आयुक्त राजेश पाटील

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोना तपासण्यांमध्ये वाढ केली आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये २४ तास लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. 

शहरात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत आयुक्त पाटील बोलत होते. महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.

शहरातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज ठेवा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. शहरातील कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार घेताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची पूर्णतः खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिका विविध पातळ्यांवर उपाययोजना राबवीत आहे. नागरिकांचे सहकार्य आणि सहभागामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवू शकलो, असे नमूद करून महापौर म्हणाल्या, ‘‘सध्या कोरोना रुग्ण संख्येमध्ये पुन्हा नव्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नेमावी. कोरोना कामकाज करताना बाधित होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, तसेच अनुकंपा तत्त्वावर तातडीने नियुक्ती द्यावी. महागड्या रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्ययावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाकडून उपाययोजना

  • कोरोना रुग्णवाढ होत असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहेत
  • गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी 
  • कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसासाठा उपलब्ध आहे 
  • आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यासाठी नियोजन आहे
  • कोरोना कामकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे
  • नागरिकांसाठी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT