This Year no response for Holi Celebration by Customer Colur Businessmen are Worried
This Year no response for Holi Celebration by Customer Colur Businessmen are Worried 
पिंपरी-चिंचवड

होळीच्या रंगाची यंदाही ‘बोंब’च! ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिकांच्या आशा धुळीला

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी : होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह म्हटले की दरवर्षी पिंपरी कॅंम्प बाजारपेठ विविध वस्तूंनी बहरलेली असते. अवघ्या चार दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. यावर्षी देखील विविध रंगाच्या पिचकाऱ्या, रंगीबेरंगी फुगे, विविध आकाराचे आकर्षक कार्टून, पिचकाऱ्यांच्या पंपासह इको फ्रेंडली रंगांनी बाजारपेठ सजलेली आहे. मात्र, कोरोनाने या बाजारपेठेच्या रंगाचा बेरंग झाला आहे. सर्व वस्तूंची सर्व विक्री थंडावल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. एक आठवड्यापासून बाजारपेठेत सर्व व्यापारी होळी मालाच्या खपाकडे डोळे लावून बसले आहेत.

सद्यःस्थिती
- या वर्षी कोरोनामुळे उत्सवाचा आनंदच नेला हिरावून
- रंग लावताना सामाजिक अंतर राखले जाणार नाही
- लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर पडू न देण्याचा पालकांचा कल
- बाजारपेठेत शुकशुकाट
- कित्येक लाखांचा माल जागेवरच पडून
- होळी व धूलिवंदनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याशिवाय विक्रेत्यांकडे पर्याय नाही

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशा आहेत किमती
- पर्यावरणपूरक रंगाचे पॅकेट ः १० ते ५० रुपये
- तीन ते साडेतीन लिटरच्या पिचकाऱ्या ः
- विविध आकारातील रंगाचे बलून ः १०० ते १५० रुपये
- रंगांचे टॅंक, छोटा भीम, बेन्टेन, थॉमस ट्रेनसह विविध कार्टून ः १५० ते २०० रुपये
- पिचकाऱ्यांचे पंपः १०० ते ५००

चोरीचा मामला; अन् नवराही फसला​

‘‘दरवर्षी मी सिजनेबल व्यवसाय करतो. यंदाही होळीच्या बाजारपेठेची आस होती. मात्र, आघाडी सरकारच्या काही निर्णयामुळे त्यावर पाणी फिरले आहे. गेल्या आठ दिवसांपासून ग्राहकच नाहीत. दुकानात पाच सेकंद मास्क खाली झाला तरी धाड टाकल्याप्रमाणे पावती फाडण्यासाठी दुकानात पोलिस शिरतात. त्यामुळे आम्ही हैराण झालो आहोत. एकीकडे ग्राहक नाही दुसरीकडे नियमांचा ससेमिरा अशा दुहेरी कात्रीत व्यापारी अडकला आहे.’’
- संजय डोलवानी, व्यावसायिक, पिंपरी

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

‘‘होळीची बाजारपेठ थंडावली आहे. दुकानात गेल्या काही दिवसांपासून ग्राहक नाही. यावर्षी माल दुकानात पडून आहे. गेल्या वर्षभरापासून नुकसान सहन करतो आहे. अजून किती दिवस असेच दिवस ढकलावे लागतील सांगता येत नाही.’’
- राज रखियानी, किरकोळ विक्रेता, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT