pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

प्रेम भंग झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी तरुणाने नातेवाईकांना मोबाईलवरून व्हाट्सअप मेसेज पाठवला होता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : प्रेम भंग झाल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मारुंजी येथे घडली. पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय २०, सध्या रा. मारुंजी, मूळ- रा. वाघाला, पो. नागपुरता, परळी वैजनाथ, जी. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मामाने फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पंकजच्या प्रेयसीसह तिच्या कुटुंबातील चौघांवर (सर्व रा. हेळम्ब, जी. लातूर ) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी तरुणीने पंकज यांचा प्रेमभंग केला. तर तिच्या कुटुंबियांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पंकज यांनी शुक्रवारी (ता. २७) मारुंजीतील ओयो फ्लॅगशिप या हॉटेलच्या रूममध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी पंकज यांनी नातेवाईकांना मोबाईलवरून व्हाट्सअप मेसेज पाठवला. त्यामध्ये आपला प्रेमभंग झाल्याने तसेच तरुणीच्या कुटुंबियांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, पंकज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT