पिंपरी-चिंचवड

वाकडमध्ये सख्ख्या भावाला लोखंडी गजाने बेदम मारहाण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  घरी दारू पिऊन आल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मद्यपीने छोट्या भावाला लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत दमदाटी केली. हा प्रकार वाकडमधील अण्णाभाऊ साठेनगर येथे घडला. 

दीपक भाऊसाहेब भोंडवे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, कावेरीनगर रोड, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निखिल भाऊसाहेब भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (रा.15) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांची आई आशा, वडील भाऊसाहेब व लहान भाऊ अजय हे घरी जेवण करीत असताना फिर्यादीचा मोठा भाऊ दीपक घरी आला. त्यावेळी "तू दारू पिऊन आलास का' असा जाब आईने त्याला विचारल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, फिर्यादी त्याला म्हणाले की "तू आम्हा सर्वांना का त्रास देतोस तुला रहायचे तर नीट रहा नाहीतर घर सोडून जा'. याचा राग मनात धरून आरोपीने हाताने व लोखंडी गजाने छोटा भाऊ फिर्यादी निखिल यास बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करीत तेथून पसार झाला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातून ड्रग्स जोपर्यंत हद्द हद्दपार होणार

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

SCROLL FOR NEXT