पिंपरी-चिंचवड

Video : 'या' तरुणांनी लॉकडाउनमध्ये काय केलं, ते तुम्हीचं पाहा

दक्ष काटकर

टाकवे बुद्रूक (ता. मावळ) : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांवर खूप वाईट वेळ आली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सर्वांना घरी बसण्याची वेळ आली. हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळेच्या जेवणाचे हाल झाले. मात्र, हेच चित्र सर्वांनी जवळून पाहिले नसले, तरी हातावर पोट असलेल्या व्यक्तिंचे लॉकडाउनमुळे कसे हाल झाले, आताही कसेही हाल होत आहेत. याचे चित्रीकरण देवले गावातील काही तरुणांनी गावाशेजारीच केले. त्यामुळे ती परिस्थिती आता सर्वांना जवळून पाहायवास मिळत आहे. 

देशात कोणतेही संकट आले, तरी सर्वसामान्य माणूसच यामध्ये भरडला जातो. तसेच, सरकारही सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामाविना हातावर पोट असलेल्या गरिबांवर कशा प्रकारे परिणाम झाला. हे देवले गावातील दीपक आंबेकर, प्रसाद घिसरे, अक्षय शिंदे, प्रतीक आंबेकर या तरुणांनी व चंद्रभागा डोंगरे या कातकरी महिलेने शॉर्ट फिल्म बनवून सर्वांना दाखवले आहे. या तरुणांनी आतापर्यंत शॉर्ट फिल्मचे दोन भाग मोबाईलमध्ये बनवले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी दोन-तीन भागांचे चित्रीकरण डिजिटल कॅमेऱ्यात करणार आहेत. त्यात लॉकडाउनमध्ये कामाविना एका गरिबावर भीक मागायची वेळ आली आहे, याचे चित्रीकरण लोणावळा शहरात करणार आहेत. सरकारनेही गरिब सर्वसामान्य कुटुंबांकडे लक्ष दिले, तर लॉकडाउनमध्ये कोणालाही भीक मागायची वेळ येणार नाही. याचेही चित्रीकरणही हे तरुण पुढील भागात दाखविणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT