पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सेवा सप्ताहाच्या माध्यमातून युवक कॉंग्रेस करतंय हे छान काम  

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने 25 जूनपर्यंत 'सेवा सप्ताह'चे आयोजन केले आहे. या सप्ताहांतर्गत 'कोरोना' या आजाराविरोधात उत्तम कार्य केलेल्यांचा 'कोरोना योद्धा' म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय गरजूंना जीवनावश्‍यक वस्तू, विद्यार्थ्यांना वह्या -पुस्तके वाटप आणि वृक्षलागवड देखील करण्यात येणार आहे. 

या सप्ताहाला शनिवारपासून (ता. 19) सुरवात झाली आहे. सांगवी येथे नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी व सफाई कामगारांना सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविले. पिंपरी गांधीनगर येथील उल्लेखनीय काम केलेले आशा सेविका वंदना गायकवाड, दीक्षा जोगदंड, अरुणा जोगदंड, अश्‍विनी पवळ, प्रतिभा बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभार, सिद्धार्थ सिरसाठ, चंद्रकांत बोचकूरे, राजेंद्र साळवे, सतीश भांडेकर, दीपक साबळे, अजय शेरखाने, मिलिंद शिंदे व विशाल पवळ यांना सन्मानित केल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस युनूस बागवान, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, सिद्धार्थ शिरसाट, मनोज गजभार, विशाल पवळ, चंद्रकांत बोककुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी रोजंदारीवरील गरजू कामगारांना किटचे वाटप केले. मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन नवीन कामगारांना 'जॉब कार्ड' मिळून रोजगार मिळवून दिला. आरोग्य विभाग, पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT