Police esakal
Nagpur_old

Police: राज्यात पोलिस नाईक संवर्ग रद्द! हिंगोली जिल्हा पोलिस दलात पदांचा सुधारित आकृतिबंध

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली: महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्रासह पोलिस अधीक्षक हिंगोली, नांदेड, लातूर व परभणी या पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली.

त्यानुसार गृह विभागाच्या शासन निर्णयाद्वारे पोलिस घटकातील पोलिस नाईक हा संवर्ग रद्द करून या संवर्गातील पदे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस शिपाई या पदात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सर्व प्रशासकीय विभाग व त्याच्या आधिपत्याखालील आणि प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांच्या आढाव्याच्या प्रस्तावना मान्यता देण्यासाठी गठीत केलेली उपसमिती व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिले होते.

त्यानुसार गृह विभागाच्या शासन निर्णयाद्वारे पोलिस घटकातील पोलिस नाईक हा संवर्ग रद्द करून या संवर्गातील पदे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस शिपाई या पदात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार आवश्यक ते बदल करून सुधारित पदाची माहिती पोलिस घटक कार्यालयाच्या आकृतिबंध प्रस्तावात दर्शविण्यात आली आहे.

त्यानुसार महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस उपमहानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र, पोलिस अधीक्षक हिंगोली, नांदेड, लातूर व परभणी या पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव हे नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचा आढावा आदी प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीसमोर प्रस्ताव सादर केला होता.

ज्यामध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलात जिल्हा पोलिस अधीक्षक १, अपर पोलिस अधीक्षक १, पोलिस उपअधीक्षक पाच, पोलिस निरीक्षक १२, राखीव पोलिस निरीक्षक १, एकूण गट अ (वर्ग १ मध्ये २० पदे), सहाय्यक पोलिस निरीक्षक १८, पोलिस उपनिरीक्षक ३८.

राखीव पोलिस निरीक्षक २, श्वान पथकातील पोलिस उपनिरीक्षक १ ,एकूण गट ब (वर्ग २) ५९ पदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १०७.

पोलिस हवालदार ३६०, पोलिस शिपाई ६.३६, सहाय्यक पोलिस निरीक्षक चालक १, पोलिस हवालदार चालक १०, पोलिस शिपाई चालक ३४, एकूण गट क (वर्ग ३) ११४८ पदे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये कार्यालय उच्चश्रेणी लघुलेखक.

सहाय्यक लेखाधिकारी प्रत्येकी १ असे एकूण गट ‘ब’ची (वर्ग २) चार पदे, निम्मश्रेणी लघुलेखक १ प्रमुख लिपिक ४, वरिष्ठ लिपिक ८, कनिष्ठ श्रेणी लिपिक १५ असे एकूण गट ‘क’ची (वर्ग ३) २८ पदे, प्रमुख आचारी, सहाय्यक आचारी, भोजन सेवक, दप्तरी, कक्षसेवक, पाणक्या, व्रणोपचारक प्रत्येकी १, सफाई कामगार ८.

कार्यालयीन शिपाई ६, एकूण गट ‘ड’ची (वर्ग ४) २२ पदे एकूण गट ‘अ’ ते ‘ड’मधील १२८१ पदे तर बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांमध्ये प्रमुख आचारी, सहाय्यक आचारी, भोजन सेवक, दप्तरी, व्रणोपचारकचे प्रत्येकी १ पदे.

कक्षसेवक २ कार्यालयीन शिपाई ६ सफाई कामगार ८ असे बाह्ययंत्रणेचे २२ पदे आहेत. त्यामुळे या शासन निर्णयात दर्शविलेल्या मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत सेवा आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या आहेत सूचना

संबंधित संवर्गात अधिसंख्य म्हणून पदे कार्यरत असल्यास ती पदे वगळून उर्वरित मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात सेवाबाह्य यंत्रणेकडून घेण्यात यावीत. अधिसंख्ये पदे जशी निरसित होतील त्या प्रमाणे आवश्यकतेनुसार बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात याव्यात अशा सूचनादेखील अधीक्षक, स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

SCROLL FOR NEXT